Thursday, June 14, 2012

गंपू : मेरे पास फेसबुक है , ऑर्कुट है ,

ट्विटर है ... तुम्हारे पास क्या है ?
.
.
.
.
.
.
.
झंपू : मेरे पास कामधंदा है !!
एका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल


दाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का ?'


तो माणूस म्हणतो , ' हो !' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ?' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं !' 
बायकोच्या चिडचिड्या स्वभावामुळे वैतागलेला गंपू एका साधू महाराजांकडे पोहोचला.

गंपू : साधू बाबा...माझी बायको सतत माझ्यावर आरडाओरडा करत असते. या कटकटीला मी फार कंटाळलो आहे. काहीतरी उपाय सुचवा.

साधू : बेटा, यावरचा उपाय जर मला माहित असता तर मी कशाला संन्यास घेतला असता?
शिक्षक : काय रे, तू पेपर कोरा का सोडलास?

विद्यार्थी : पण टापटिपीचे पाच मार्क तर मिळतील ना?

कॉलेजचे दिवस


Saturday, June 9, 2012


एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञान ुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )


 https://www.facebook.com/alohote
आजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6
ट्रँक्टर, 50 जनावरे & 2,28,896 रूपये नगद
तुझ्या नावावर करते.
.
.
मुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे ?
.
... .
.
.
.
आजी : Farmville on फेसबुक
https://www.facebook.com/alohote

Tuesday, June 5, 2012

    गंजून 
संपण्यापेक्षा 
   झिजून 
   संपणे 
   चांगले........

Saturday, June 2, 2012

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार..

1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
 तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
 माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा

Wednesday, May 23, 2012

एका प्रसिद्ध जपानी कवितेचा मराठी अनुवाद

जे अशक्य वाटते ते स्वप्नं मला बघायचं आहे,
ज्या शत्रूचा पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे,
कुणाला सहन होत नाही ते दु:ख मला सहन करायचे आहे,
ज्या ठीकांनी धाडशी माणसं जाण्याचे धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे,
ज्या वेळी माझे पाय थकले आहेत हात थकले आहेत, माझे संपूर्ण शरीर ठाकले आहेत,
पण मला समोर माझे यश दिसत आहे त्यावेळी मला माझ्या यश कडे माझे एक एक पावूल टाकायचं आहे,
त्या यशाला मला गाठ्याचे आहे, मला त्या यश प्राप्ती साठी संघर्ष करायचा आहे,
मला कुठले हि कारण चालणार नाही, मला कुठला हि थांबा घ्यायचा नाही,
माझी नरकात जाण्याची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असले पाहिजे . . . !


Monday, May 21, 2012

nana patekar vs raj thackeray

टेक रिस्क इन युअर लाईफ... 
इफ यू विन... यू कॅन लिड 
इफ यू लूझ... यू कॅन गाईड
आकाशाला गवसणी घालणार्‍या गरुडाला पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते. खाली येणे म्हणजे त्याची हार नसते तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.

मी लहानपणी


Sunday, May 13, 2012

मळलेल्या पायवाटेवरून कधीच जाऊ नका. 


स्वतःची आदर्श पायवाट तयार करा आणि 


त्यावर तुमच्या पाऊलखुणा सोडा.